E-Pass Maharashtra: लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्रात प्रवास करण्याचा Travel E-Pass कसा मिळवायचा?

travel pass in maharashtra
Travel Pass In Maharashtra 

लॉकडाऊन मध्ये महाराष्ट्रात प्रवास करण्याचा Travel E-Pass कसा मिळवायचा? (How To Get Travel E Pass In Maharashtra During Lockdown?)


सध्या महाराष्ट्रात लॉकडाऊनमुळे वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या गावाकडे, घराकडे जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने या Travel E-Pass 
Maharashtra ची व्यवस्था केली आहे.

ज्या नागरिकांना महाराष्ट्रात किवा महाराष्ट्रा बाहेर प्रवास करायचा आहे त्यांच्या साठी महाराष्ट्र शासनाने विशेष वेबसाईट तयार केली आहे. (How To Get Travel E Pass In Maharashtra)


हे नक्की वाचा: TikTok ला टक्कर देण्यासाठी YouTube च नवं फिचर

या वेबसाईटवर तुम्हाला प्रवासाची संपूर्ण माहिती द्यायची आहे, जसे कि का व कोठे प्रवास करणार आहात. 

ज्या जिल्ह्यात तुम्ही अर्ज केला आहे, त्या जिल्ह्याचे अधिकारी अर्जाची छाननी करतील व त्या नंतर तुम्हाला प्रवास करण्याची परवानगी मिळणार आहे.

चला तर बघू काही स्टेप्स मध्ये हा पास online कसा मिळवायचा (How To Get Travel E Pass In Maharashtra During Lockdown?)hoe to get epass


Online E Pass In Maharashtra

स्टेप 1 : या साठी तुम्हाला महाराष्ट्र पोलिसांच्या ( https://covid19.mhpolice.in/registration ) संकेतस्थळावर माहिती भरावी लागणार आहे. (maharashtra e pass link)

स्टेप 2 : त्यानंतर तुम्हाला विचारल जाईल कि तुम्ही प्रवास महाराष्ट्रात करणार आहात कि महाराष्ट्र बाहेर त्यावर तुम्ही हो किवा नाही निवडायच आहे.

स्टेप 3 : त्यानंतर नाव, सध्या राहत असलेला पत्ता, जाण्याच्या ठिकाणाचा पत्ता, किती लोक जाणार आहेत, प्रत्येकाची नावे, आधार क्रमांक, प्रवासाची तारीख, कोणत्या वाहनाने प्रवास करणार आहात याची संपूर्ण माहिती भरावी लागेल.

स्टेप 4 : आता तुम्हाला तुमचा फोटो, आधार कार्ड आणि तुमच्यात कोणतेही कोरोना लक्षण नाहीत अस Medical Certificate अपलोड कराव लागेल.

(फोटो ची साईझ हि 200KB व Documents ची साईझ हि 1MB च्या आत असायला हवी)

स्टेप 5 : संपूर्ण माहिती भरून झाली कि save बटन वर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला एक Application Id प्राप्त होईल.

हा Application Id तुमच्या अर्जाच status बघण्यासाठी व Travel E-pass डाऊनलोड करण्यासाठी वापरावा लागेल.

स्टेप 6: Approval मिळाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वर मेसेज येईल, त्यानंतर तुम्हाला याच वेबसाईटवर येऊन Travel E-pass डाऊनलोड करायचा आहे.

अश्याच नविन Article साठी वेबसाइटचे नोटिफिकेशन ऑन करा.

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
 
हे पहा:

Reliance Jio चे नवीन जबरदस्त Work From Home प्लान!


Web Title: How To Get Travel E Pass In Maharashtra?


2 Comments

 1. ajun Pan E-Pass ghenya chi garaj ahe ka?

  ahe tr mg police jeva check krtat teva paise ka ghetat?

  ReplyDelete
  Replies
  1. हो तुम्हाला E-Pass घेऊन प्रवास करणेच सोयीचे होईल!

   Delete

Post a comment

Previous Post Next Post