![]() |
Realme Smartwatch |
25 तारखेला Realme लाॅन्च करतेय पहिली Smartwatch; पहा काय आहेत फीचर्स व किंमत
Realme सध्या भारताच्या बाजारात मोठ्या प्रमाणात मोबाईलची विक्री करत आहे. त्याच कारण म्हणजे कमी किंमती मध्ये चांगले फीचर्स.तर Realme आता त्यांच्या ग्राहकांसाठी पहिली Realme Smartwatch 25 मे ला भारतात लाॅन्च करणार आहे, त्याच बरोबर Realme Smart Tv हि बाजारात आणत आहे.
Realme ने त्यांच्या ऑफिशिअल वेबसाईटवर काही फोटो शेअर केले आहेत. यात Realme Smartwatch थोडीशी Apple Smartwatch सारखी दिसत आहे.
Realme Smartwatch चे फीचर्स पहा (Realme Smartwatch Features and Specifications)
- यात तुम्हाला 1.4 इंच चा लार्ज कलर डिस्प्ले मिळणार आहे. त्याचबरोबर साईड पॅनेलवर ऑन ऑफ बटन असेल.
- या वाॅच मध्ये काल्सिक Strap वापरले आहेत, तीन कलर मध्ये हे Strap मिळतील ज्यात नीला ,लाल व हिरवा कलर उपलब्ध आहेत.
- हि स्मार्टवाॅच इंटेलिजेंट (Intelligent) अॅक्टिव्हिटी ट्रॅकरसह असेल जे क्रिकेट, योग, टेबल टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, बॅडमिंटन, इलीप्तीक्ल, स्पिंनिग, एरोबिकश 14 स्पोर्ट्स मोड असतील.
![]() |
Realme Smartwatch Specifications And Price |
- यात तुम्हाला व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, जीमेल, फेसबुक मेसेंजर, एसएमएस, इंस्टाग्राम चे नोटिफिकेशन हि मिळणार आहे. त्याचबरोबर स्मार्टवॉच तुम्हाला पाणी पिण्याचीही आठवण करून देईल.
- Realme Smartwatch मध्ये बॅटरी पर्सेंटेज, हार्ट रेट,स्टेप Count, कॅलरी Count, तापमान आणि तारीख व वेळ पाहता येणार आहे.
- त्याचबरोबर हि स्मार्टवाॅच Realme लिंकशी कनेक्ट करता येणार आहे जे तुम्हाला प्ले स्टोर वरून डाउनलोड करता येईल.
तर 25 मे ला 12.30 वाजता हि स्मार्टवाॅच लाॅन्च होणार आहे. Realme च्या ऑफिशियल वेबसाइटवर व फ्लिपकार्ट वर स्मार्टवाॅच खरेदी करता येईल.
वाॅच च्या किमती बद्दल Realme ने कोणतीही अधिकृत माहिती अजून तरी दिलेली नाही.
हि वाॅच तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा व नवीन अपडेट्स साठी इमेल सब्स्क्रीप्शन ऑन करा.
सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email
Web Title: Realme Going To Launch First Smartwatch In India On 25 May
Post a comment