Tech Talks #1- दिवसातील टाॅप टेक न्यूज (Top Tech News Of The Day)

Tech Talks By Marathi Host


Tech Talks #2 ( टेक टाॅक्स ) - 27 मे 2020


टेक टाॅक्स इन मराठी हि नवी सिरीज Marathi Host आपल्यासाठी घेऊन येतय, यामध्ये आपण दिवसभरातील महत्त्वाच्या टेक न्यूज बद्दल ची माहिती घेणार आहोत.

नक्कीच हि सिरीज तुम्हाला आवडेल अशी आशा आम्ही करतोय. चला तर मित्रांनो एका मिनिटात आजच्या दिवसभरातील टेक न्यूज पाहूयात.

चला सुरु करू या!

1. सॅमसंग गॅलेक्सी A51 8GB व्हेरिएंट भारतात लॉन्च झाला

सॅमसंगने आपल्या गॅलेक्सी A51 स्मार्टफोनमध्ये नवीन स्टोरेज Varient अॅड केला आहे.  आता 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह A51 स्मार्टफोन उपलब्ध असेल. 


गॅलेक्सी A51 च्या या व्हेरिएंटची किंमत, 27,999 आहे. गॅलेक्सी A51 ‘प्रिझम ब्लॅक’, ‘प्रिझम क्रश व्हाइट’ आणि ‘प्रिझम क्रश ब्लू’ या तीन रंगांच्या पर्यायांमध्ये आहे.

गॅलेक्सी A51 चा नवीन Varient ऑफलाइन रिटेल स्टोअर्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर आणि सॅमसंगच्या ई-स्टोअरमध्ये देखील उपलब्ध असेल.  

वाचा : फक्त 3,999 रुपयात मिळतेय Apple वाॅच सारखी स्मार्ट वाॅच; Realme चे 4 नवीन प्रोडक्ट लाॅन्च 

2. फीचर फोन युझर्सना यूपीआय रिचार्ज करता येणार :पेटीएम  

पेटीएमने  फीडफोन युझर्सना युपीआयचा वापर करून त्यांचे नंबर रीचार्ज करण्यास परवानगी देण्यासाठी व्होडाफोन आयडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) यांनी भागीदारी केली आहे.

पेटीएम आता फीचर फोन वापरकर्त्यांना त्यांच्या व्होडाफोन आयडिया क्रमांकासाठी वैध यूपीआय आयडीसह रिचार्ज करण्यास सक्षम बनवित आहे. देशातील दूरसंचार प्रमुख आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) बरोबर ही सेवा देशभर वाढवणार असल्याचे पेटीएमने एका निवेदनात म्हटले आहे.

वाचा: इन्स्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे | How to Earn Money on Instagram in Marathi

3. Google कर्मचार्‍यांना घरून काम करण्यासाठी लागणाऱ्या वस्तू खरेदी साठी देतय 75000 भत्ता
गूगल घरातून काम करण्यासाठी आवश्यक फर्निचर व उपकरणे खरेदी करण्यासाठी कर्मचार्‍यांना $1000 चा म्हणजे 75000 भत्ता देत आहे. 

गूगल आणि अल्फाबेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचार्‍यांना ईमेलद्वारे घरातून काम करणे आणि ऑफिसमध्ये परत जाण्याचे कसे नियोजन केले आहे याची माहिती शेअर केली.
वाचा : Whatsapp च नवं फिचर एका क्लिक मध्ये करा नंबर सेव.  

4. आता WhatsApp वरून होणार गॅस बुकिंग  
   
भारत गॅसने हि सुविधा त्यांच्या ग्राहकांसाठी आणली आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार व्हाट्सएपवर बीपीसीएल स्मार्टलाईन नंबर 1800224344 वर गॅस बुकिंग करता येणार आहे.

गॅस बुकिंग झाल्यानंतर ग्राहकांना एक मेसेज येईल ज्यामध्ये एक लिंक असेल या वर पेमेंट करता येणार आहे.   

अशीच टेक बद्दल ची माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला आम्ही खाली एक लिंक देत आहोत त्यावर क्लिक करून सब्सक्राईब करा.

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email

किंवा उजव्या कोपऱ्यामध्ये बेल च चिन्ह आहेत तिथ क्लिक करून पण सब्सक्राईब करू शकता.
Post a Comment

Previous Post Next Post