काय आहे Aarogya Setu App आणि हे काम कस करत! याचा वापर कसा करायचा.

aarogya setu app
What Is Aarogya Setu App


काय आहे Aarogya Setu App आणि हे काम कस करत! याचा वापर कसा करायचा. 


भारतात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. सध्या 90,००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत व 3000 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे.  याला थांबवण्यासाठी भारत सरकार वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून लोकांच्या सुरक्षेसाठी भारत सरकारने Aarogya Setu App विकसित केल आहे.

Aarogya Setu App हे कोरोना ट्रान्झिशन इंडिकेटर अ‍ॅप आहे. हे भारत सरकारने सुरू केले आहे. आरोग्य सेतु हे एनआयसी आणि भारत सरकारने तयार केलेअसून ते  नवीन तंत्रज्ञानावर आधारित एक सूचना देणारे अ‍ॅप आहे.

जेव्हा हे अ‍ॅप वापरणारा व्यक्ती जेंव्हा कोरोना संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येतो तेव्हा हे अ‍ॅप त्याबद्दल सूचना देण्यास सक्षम आहे. 

Aarogya Setu अ‍ॅप Android आणि IOS या दोन्हीसाठी साठी उपलब्ध आहे. प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअर वरून हे  अ‍ॅप डाऊनलोड केले जाऊ शकत.

या Aarogya Setu Appच्या माध्यमातून तुम्हाला भारत सरकारकडून देण्यात येणारी कोरोना विषाणूची सर्व माहिती मिळू शकेल.


आरोग्य सेतू अ‍ॅप कस काम करत? (How Aarogya Setu App Works?)
How Aarogya Setu App Works
How Aarogya Setu App Works

आरोग्य सेतू अ‍ॅप मध्ये तुम्हाला एक टेस्ट करावी लागेल. ती म्हणजे Assessment Test ज्यात काही गोष्टी विचारल्या जातील जसे,कि खोकला, ताप किवा श्वास घेण्यात त्रास हे तुम्हाला कोणतीही माहिती न लपवता सांगायचं आहे.

जर तुम्हाला या पैकी कोणताही त्रास नसेल तर तुमचा रिपोर्ट You Are Safe येईल. Aarogya Setu App हे ब्लूटूथ आणि लोकेशन वर बेस्ड असल्यामुळे या दोन्ही गोष्टी तुम्हाला नेहमी चालू ठेवाव लागेल.


Aarogya Setu App
Aarogya Setu App Interface

तुम्ही जर गर्दीच्या ठिकाणी जाता तेंव्हा या अ‍ॅपच्या इंटरफेस मध्ये मेसेजस ची देवाण घेवाण होत असते. तुमच्या संपर्कात येणारे लोक Safe आहेत कि नाही हे या आरोग्य सेतू अ‍ॅपमुळे निश्चित केल जात. 

जर तुमच्या संपर्कात आलेल्या कोणत्या नॉर्मल व्यक्ती हा  १० दिवसानंतर पोझिटिव्ह होतो, तर त्या बद्दल तुम्हाला आरोग्य सेतू अ‍ॅप सतर्क करेल.

10 दिवसांपूर्वी त्या व्यक्तीला संसर्ग झाला होता, जो आता स्पष्ट दिसत आहे. आता तुमची तपासणी त्वरित करा. तसेच हे अ‍ॅप त्या सर्व लोकांना माहिती देईल जे लोक त्या व्यक्तीच्या संपर्कात आले आहेत.

जर तुम्ही एखाद्या ऑरेंज झोन किंवा हॉट स्पॉट असलेल्या क्षेत्रात प्रवेश करत असताल तर हे अ‍ॅप रिंग करून तुम्हाला अलर्ट करेल.

आरोग्य सेतू अ‍ॅपचे फायदे (Benefits Of Aarogya Setu App)   
Benefits of Aarogya Setu App
Benefits of Aarogya Setu App

- तुमच्या संपर्कात आलेला कोणताही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह नाही याची खात्री होते.

- Aarogya Setu App वर कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी 
  अनेक नवीन लेख आणि टिप देखील मिळतील.      

- अ‍ॅपवर आपण कोरोना पॉझिटिव्ह आहात की नाही याची दररोज योग्य माहिती देऊन आपण आपले                    आरोग्य विनामूल्य तपासू शकता.

- जर चुकून एखाद्या अज्ञात कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आलात तर अलर्ट मिळेल. 

आरोग्य सेतू अ‍ॅप कस डाऊनलोड करायचं! (How To Download Aarogya Setu App)

हे अ‍ॅप Google Play Store किंवा Apple App स्टोअरवर विनामूल्य डाउनलोडसाठी उपलब्ध आहे. आपल्याला फक्त ते आपल्या फोनमधील प्ले स्टोअर वरून डाउनलोड करायचे आहे.

आपण आपला मोबाईल नंबर, नाव, आपले वय, आपला व्यवसाय अश्या काही गोष्टी भराव्या लागतील. सर्वकाही योग्यरित्या भरल्यानंतर आणि हा अ‍ॅप सेट केल्यानंतर, हा अ‍ॅप पूर्णपणे वापरण्यासाठी तयार आहे आणि आपण त्यावर आपल्या चाचण्या इ. सुरू करू शकता. 

काही त्रास किंवा संसर्ग होण्याची शक्यता असल्यास हे आपल्याला कळवेल.

Download Aarogya Setu App
Download Aarogya Setu App

तसेच हे आरोग्य सेतू अ‍ॅप या लिंक च्या माध्यमातून डाऊनलोड करू शकता.

Aarogya Setu (Google Play Store) -  

https://play.google.com/store/apps/details?id=nic.goi.aarogyasetu

 Aarogya Setu (Apple App Store) -

https://apps.apple.com/in/app/aarogyasetu/id1505825357

स्वतः च्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहायला गेल तर हे अ‍ॅप उपयोगी ठरणार आहे. तर हे आरोग्य सेतू अ‍ॅप डाऊनलोड करा व सुरक्षित रहा.

सब्सक्राईब करण्यासाठी इथ क्लिक करा >> Subscribe to Marathi Host » Tech Updates In Marathi by Email


Web Title: What Is Aarogya Setu App & How It Works! How To Use It.    
Post a Comment

Previous Post Next Post