फेसबुकच्या या नव्या फिचर मुळे एकदाच करता येणार जुन्या पोस्ट डिलीट

How to bulk delete your old Facebook posts
Bulk Delete Facebook Old Posts

फेसबुकने आता एक नवं फिचर आणलं आहे ज्यात तुम्हाला फेसबुक प्रोफाईल वरील जुन्या व नको असलेल्या सर्व पोस्ट्स एकदाच डिलीट किंवा लपवता (हाइड) करता येणार आहेत.

मॅनेजमेंट अ‍ॅक्टिव्हिटी अस या फिचरच नाव आहे, ज्यांना कोणाला जुन्या आठवणी लपवायच्या किंवा डिलीटच करायच्या आहेत, त्यांना आता प्रत्येक पोस्टला स्क्रोल करत त्याला शोधायचे मग डिलीट करायचे.

हे आता कराव लागणार नाही. आणि हो जर मन बद्दल असेल व त्या डिलीट केलेल्या पोस्ट परत हव्या असतील तर ते हि करता येणार आहे.

या डिलीट केलेल्या पोस्ट्स 30 दिवस ट्रॅश बिन मध्ये राहील. मग तिथून रिस्टोर करू शकता.

चला तर बघू कस वापरायच हे फिचर:
(How to bulk delete your old Facebook posts) 

या काही स्टेप्स आहेत बघा करून 

स्टेप 1: प्रोफाईल पेज वर सर्च बार मध्ये Activity Log अस सर्च करायचं त्यावर क्लिक करा 

स्टेप 2: फिल्टर्स च्या शेजारी Manage Activity अस दिसेल त्यावर क्लिक करायचं 

स्टेप 3: नंतर खाली येईल Your Posts ते ओपन करा 

स्टेप 4: आता Filters वर क्लिक करा 

स्टेप 5:  Category मध्ये posts or select specific posts, text updates, check-ins, photos किंवा videos
            हे निवडा  

स्टेप 6: तुम्हाला डिलीट करायच्या असलेल्या पोस्ट Select करा 

स्टेप 7: जर लपवायच्या असतील तर Archive करा अन्यथा डिलीट करा

अगदी सोप आहे!

असेच नवीन आर्टिकल हवे असतील तर उजव्या कोपऱ्यात बेल आयकॉन आहे त्याला क्लिक करून SUBSCRIBE करा!


 Web Title: How to bulk delete your old Facebook posts


Post a Comment

Previous Post Next Post