Nisarga Cyclone Live Tracking | थैमान घालत आहे "निसर्ग चक्रीवादळ" लाईव्ह

Nisarga Cyclone Live Tracking: महाराष्ट्रात निसर्ग चक्रीवादळ (Nisarga Cyclone) आज मुंबई कोकण किनार पट्टीला धडकण्याची शक्यता आहे.

सुमारे 100 ते 110 किलोमीटर ताशी वेग असलेल हे निसर्ग चक्रीवादळ सकाळी ११ ते रात्री 12 वाजेपर्यंत मुंबई, रायगड या जिल्ह्याना धडकणार आहे.

 हे वाचा: तुमच्या फोन मध्ये असलेल्या चायनिज अ‍ॅप्स ची लिस्ट

              इन्स्टाग्राम वर पैसे कसे कमवायचे


निसर्ग चक्रीवादळाच्या IMD ने दिलेलं लाईव्ह Tracker: Nisarga Cyclone IMD Tracker
Nisarga Cyclone Live Updates\Status


  • 03 June -  01.48PM
मुंबई मध्ये हाय अलर्ट 

  • 03 June -  01.42PM
मुंबईत वाऱ्याचा वेग वाढल्याने खबरदारी म्हणून वांद्रे-वरळी सी लिंक बंद करण्यात आला आहे. वाहनं पुन्हा माघारी फिरत आहेत.
  • 03 June -  01.16PM
निसर्ग चक्रीवादळाच्या लॅण्डफॉलला सुरुवात झाली आहे. अलिबाग समुद्रकिनारी चक्रीवादळ धडकलं आहे. येत्या दोन तासात वॉल क्लाऊड्स मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने सरकत आहेत. पुढच्या दोन तासात मोठा पाऊस आणि वाऱ्याचा वेग असेल, असा अंदाज आहे.
  • 03 June - 01.01PM
पालघर जिल्ह्यात वादळाचा प्रभाव वाढू लागला असून समुद्र खवळलेला पाहायला मिळतोय, तर वाऱ्याचा वेग ही वाढला आहे. सध्या NDRF ची टीम समुद्र भागाची पाहणी करत असून नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देत आहेत.
  • 03 June - 12.50PM
  • 03 June - 10.46AM
निसर्ग चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. चक्रीवादळ अलिबागपासून 115 किलोमीटर दूर, तर मुंबईपासून 165 किलोमीटर अंतरावर पोहोचलं आहे.
  • 03 June - 10.20AM
CRPC कलम 144 लावण्यात आलं असून लोकांनी समुद्र किनारी न जाण्याचा आव्हान पोलिसांनकडून करण्यात आलं आहे. तसेच मुंबई पोलीस कर्मचारी आणि त्यांच्यासोबत अतिरिक्त पोलीस दल, एनडीआरएफ, एसआरपीएफ, होमगार्डचे तैनात करण्यात आलेले आहेत. तसेच लोकांनी घरीच राहण्याचे आवाहन देखील मुंबई पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे.
  • 03 June - 10.10AM
रत्नागिरी- मिऱ्या समुद्रात अजस्त्र लाटामध्ये अडकलं भरकटलेले जहाज, जहाजाला मिरकरवाडा बंदरात देण्याचे प्रयत्न असफल, जहाजावर काही खलाशी अडकल्याची भीती

  • 03 June - 9.57AM
श्चिम उपनगरातील अक्सा बीचवर सकाळी 10:15 वाजता भरती असल्याने समुद्रात 4.26 मीटर उंचीच्या लाटा येणार आहेत. लॉकडाऊनमुळे नाममात्र वर्दळ असल्याने बीचवर प्रशासनाचा फारसा बंदोबस्त नाही.


Live Reports : 


Nisarga Cyclone Live Tracking

All The Data Sourced By Amar Jagtap

Post a Comment

Previous Post Next Post