Samsung Galaxy A21s: सध्या भारतीय मोबाईल बाजारात चायनीज कंपन्यांची चांगलीच पकड आहे, पण या कोरोना प्रादुर्भावानंतर भारतातील ग्राहकांचा कल हा नॉन चायनीज स्मार्टफोन कडे आहे.
त्याचाच फायदा घेत, सॅमसंग परत एक वेळेस भारतीय बाजारात आपली जागा पक्की करण्यासाठी प्रयत्न करत आहे.
17 जून ला सॅमसंग आपला नवीन Samsung Galaxy A21s हा स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. Samsung Galaxy A21s हा स्मार्टफोन या वर्षी आलेल्या Galaxy A21 चे अपडेटेड व्हर्जन आहे.
सॅमसंग इंडियाने ट्विटरवर १३ सेकंदाचा टीझर व्हिडिओ रिलीज करत या फोनच्या लाँचची माहिती दिली आहे. सॅमसंगचा हा फोन दमदार बॅटरी आणि पंचहोल डिस्प्ले सोबत येईल.
Samsung Galaxy A21s फोन गेल्या महिन्यात युरोपमध्ये लाँच करण्यात आला आहे. युरोपमध्ये Samsung Galaxy A21s स्मार्टफोनची किंमत 200 यूरो म्हणजेच 17 हजार 100 रुपये ठेवण्यात आली आहे.Awesomeness that goes on and on! The new Samsung #GalaxyA21s is coming your way. Follow this space to know more. #Samsung pic.twitter.com/YOuShYFeIF— Samsung India (@SamsungIndia) June 15, 2020
सॅमसंग गॅलेक्सी A21s ची वैशिष्ट्ये | Samsung Galaxy A21s Specifications :
स्पेसिफिकेशन | Samsung Galaxy A21s |
---|---|
डिस्प्ले | 6.5 इंचाचा HD+ infinity-O 720X1,600 पिक्सलच्या रिझॉल्यूशनसह |
बॅटरी | 5,000 mAh, 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट |
ऑपरेटिंग सिस्टीम | One UI सोबत अँड्रॉयड 10 |
कॅमेरा | रिअर कॅमेरा - ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा - वाइड कॅमेरा, २-२ मेगापिक्सलचे २ कॅमेरे फ्रंट कॅमेरा - व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फी साठी फोनमध्ये फ्रंटला १३ मेगापिक्सलचा कॅमेरा |
Search Term: Samsung Galaxy A21s launches on June 17; Know the specification
Post a comment