मॉरोटेरियम म्हणजे काय? | Moratorium Meaning In Marathi

Moratorium Meaning In Marathi

Moratorium Meaning In Marathi | सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे त्याच बरोबर अर्थव्यवस्था चालू ठेवण्यासाठी नियमासह काही व्यवसाय यांना परवानगी दिली जात आहे तर काहीना अजून हि लॉकडाऊन चे नियम पाळावे लागतील. 

पण सध्या सर्वाना एक मेसेज त्यांच्या मोबाईल किंवा ईमेल वर नेहमी दिसतोय तो म्हणजे Moratorium. आता अस काही असलेला मेसेज एकतर RBI कडून प्राप्त होतोय किंवा तुम्ही लोन घेतल असलेल्या बँकेडून.

चला तर आपल्या इंटरनेट सिरीज मध्ये Moratorium Meaning In Marathi ह्याचा अर्थ नेमका आहे तरी काय हे पाहू या!  


मॉरोटेरियम म्हणजे काय?

गुगलच्या भाषेत सांगायचं झाल तर मॉरोटेरियम चा अर्थ होतो "कर्जफेड पूढे ढकलण्याचा कायदेशीर अधिकार"

मॉरोटेरियम कालावधी ( Moratorium Period) या मध्ये घेतलेल्या कर्जाचे मासिक हफ्ते भरणे गरजेचे नाही. व हे हफ्ते नाही भरले म्हणून तुमच्या क्रेडीट स्कोर वर याचा कोणता हि परिणाम होणार नाही. 

या मध्ये तुमचा कर्जाचा हफ्ता माफ नाही होणार पण काही महिन्यांसाठी स्थगित केला जाईल. आता मध्ये कोणते कर्ज येईल हे पण पाहून घेऊ, वैयक्तिक कर्ज आणि क्रेडिट कार्डवरील थकित कर्ज ह्या मोरोटियमच्या मध्ये येत नाही, यामध्ये येत ते वस्तू खरेदीसाठी घेतलेलं कर्ज, कारसाठी घेतलेलं लोन व घर खरेदीसाठी च कर्ज या मध्ये असेल.

त्यासोबत मॉरोटेरियम कालावधी मध्ये वेगवेगळ्या बँकांचे आपआपले काही नियम व अटी आहेत त्यासाठी तुम्हाला त्या बँकेच्या वेबसाईट ला भेट द्यावी लागेल. 

ग्राहकांचा फायदा कश्यामध्ये आहे?

मॉरोटेरियम कालावधीमध्ये व्याज हे कर्जाच्या मुद्दल मध्ये जोडले जाईल. परंतु हा कालावधी संपल्यानंतर, आपल्याला प्रलंबित व्याज देखील द्यावे लागेल. म्हणजे आपल्याला पूर्वीपेक्षा काही अधिक व्याज द्यावे लागेल. म्हणूनच, आपल्याकडे मोरोटेरियमची सुविधा असली तरीही, आपल्याला अर्थिक अडचण असेल तरच आपण हा पर्याय निवडला पाहिजे. 

आपल्याकडे हफ्ता भरण्यासाठी पैसे असल्यास आपल्याला हप्ता भरण्यामध्येच फायदा आहे.

Tenure Meaning In Marathi

शेवट 

तुम्हाला मॉरोटेरियम म्हणजे काय? | Moratorium Meaning In Marathi हा लेख नक्की आवडला असेल अशी आशा आहे व आणखी काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये बिनधास्त पणे विचारा, लवकरात लवकर उत्तर देऊ. 

व आणखी अपडेट हव्या असतील तर बेल दिसतेय साईडला त्याला क्लिक करून सब्सक्राईब करा!


  

Post a Comment

Previous Post Next Post