Apple आणि Samsung च्या फोनसोबत आता चार्जर मिळणार नाही.

now chargers will not be available with new phones apple samsung may start

अनेक मोबाईल कंपन्यांनी स्मार्टफोन सोबत हेडफोन देण जवळपास बंदच केल आहे. आता मोबाइल कंपन्या नवीन फोनसोबत दिला जाणारा चार्जर सुद्धा बंद करण्याची शक्यता आहे.

Sammobile च्या रिपोर्टनुसार 2021 पासून सुरू होणार्‍या काही स्मार्टफोनच्या बॉक्समध्ये सॅमसंग चार्जरचा समावेश करणार नाही असे सांगण्यात आलं आहे. 

हे वाचा | इंस्टाग्रामवर कमेंटला पिन करण्याचं फिचर सर्वांसाठी उपलब्ध


कंपनी चार्जर बॉक्सच्या बाहेर काढत आहे कारण बर्‍याच लोकांकडे जुने चार्जर आधीच आहेत आणि याची मदत हि  खर्च कमी करण्यात होईल, अस म्हटल जात आहे.

व ज्यांच्या कडे चार्जर नाहीत त्याच्या साठी स्वतंत्र चार्जर खरेदीसाठी उपलब्ध असतील.

असा निर्णय करत असलेली सॅमसंग हि एकमेव कंपनी नसून, अ‍ॅपल आपल्या iPhone 12 सीरीज सोबत चार्जर न देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 

सध्या आयफोनसह येणारे 5W आणि 18W चार्जर न देता त्याऐवजी स्वतंत्रपणे विकले जाणारे नवीन 20 डब्ल्यू फास्ट चार्जर देऊ शकतात,

हे वाचा | स्वतःचा फेसबुक अवतार कसा बनवायचा भविष्यात म्हणजे लवकरच चार्जिंग पोर्टच फोन मधून गायब होईल अस हि होऊ शकत. कारण अ‍ॅपल सध्या तरी त्यांच्या फोन मध्ये वायलेस चार्जिंग वर जास्त भर देत आहे.  

सॅमसंग आणि अ‍ॅपल या मार्गाने आपल्या फोनचे दर कमी करणे आणि त्यांचे फोन पॅकेजिंग लहान करणे हा एक मोठा उद्देश असू शकतो, त्याचबरोबर याचा महत्त्वपूर्ण फायदा पर्यावरणावरही होऊ शकतो.

या मुळे ई वेस्टवर मोठ्या प्रमाणात आळा बसणार आहे सोबतच मोबाईल कमी किंमती मध्ये मिळतील. पण कंपन्या कोणत्याही प्रकारे त्यांचा फायदा करून घेतली हे नक्की आहे.

इथं क्लिक करून आम्हाला गुगल न्यूज वर फॉलोव करा!  - Google News 

Post a Comment

Previous Post Next Post