सॅमसंग गॅलेक्सी एम सिरीज मधला Samsung Galaxy M31s हा नवीन स्मार्टफोन आज भारतात लाँच करण्यात आला.
हा नवीन फोन Galaxy M31 चा अपग्रेड व्हर्जन आहे, जो कि याच वर्षी फेब्रुवारी मध्ये लाँच झाला होता. Samsung Galaxy M31s हा फोन होल-पंच डिस्प्ले आणि क्वाड रीअर कॅमेरा सेटअप सह बाजारात आणला आहे.
तसेच उत्कृष्ट कॅमेरा अनुभव देण्यासाठी यामध्ये Intelli-Cam फिचर व प्रथमच Sony IMX682 सेन्सर चा वापर करण्यात आला आहे या द्वारे Single Take मध्ये ७ फोटो व ३ व्हिडिओ काढता येतील, ज्यामध्ये आपल्या आवडीचे फोटो किंवा व्हिडीओ निवडता येतील.
या मध्ये Redmi Note 9 Pro Maxआणि Realme 6 Pro प्रमाणे रिव्हर्स चार्जिंग सपोर्ट हि देण्यात आला आहे, फोन सोबत २५W चा USB Type-C चार्जर देण्यात आला आहे.
हे वाचा | स्वतःचा ब्लॉग किंवा वेबसाईट कशी सुरु करायची!
Samsung Galaxy M31s ची किंमत (Price)
भारतात Samsung Galaxy M31s 6 जीबी रॅम बेस व्हेरियंटची किंमत रु.19,499, तर 8 जीबी रॅम व्हेरियंटची किंमत रु. 21,499 असेल .फोन मिराज ब्लॅक आणि मिराज ब्लू कलरमध्ये आला आहे. शिवाय, 6 ऑगस्टपासून सॅमसंग शॉप आणि Amazon वर या फोनची विक्री होईल. Amazon प्राइम डे च्या पहिल्या दिवशी हा फोन विक्री साठी उपलब्ध असेल.
Samsung Galaxy M31s फीचर्स (Specifications)
Samsung Galaxy M31s |
फीचर्स (Specifications)
|
---|---|
डिस्प्ले | 6.5" FHD+ Super AMOLED Infinity-O Display |
प्रोसेसर | Octa-core Exynos 9611 SoC |
रॅम | 6GB/8GB |
स्टोरेज | 128GB + Expandable Upto 512GB |
कॅमेरा | 64MP Quad Camera + 12MP Ultrawide + 5MP Macro Lens + 5MP Depth |
फ्रंट कॅमेरा | 32MP |
बॅटरी | 6000mAh 25W Fast Charge with Reverse Charging |
ऑपरेटिंग सिस्टिम | OneUI based on Android 10 |
नेटवर्क | 4G Dual VoLTE |
सेन्सर्स | Light sensor, Proximity sensor, GeoMagnetic sensor, Gyro-meter, Accelerometer sensor |
प्रोसेसर | Octa-core Exynos 9611 SoC |
किंमती | 6GB/128GB - रु 19,499 8GB/128GB - रु 21,999 |
बेस्ट डिस्काउंट | https://amzn.to/2XawqMu |
Post a comment