Apple, Bill Gates आणि Elon Musk यांचे अकाऊंटस हॅक करून हॅकर्सनी 2 तासांत ₹ 90 लाख कसे गायब केले?

twitter hacked

Apple, Bill Gates आणि Elon Musk यांचे अकाऊंटस हॅक करून हॅकर्सनी 2 तासांत ₹ 90 लाख कसे गायब केले? हि एक अशी न्यूज आहे, जी खूप मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे.

कारण गोष्टच अशी आहे, तुम्हाला विश्वास तरी बसेल का Apple चं अकाऊंट हॅक झालं आहे, Bill Gates चं अकाऊंट हॅक झालं आहे एवढचं नाही Barak Obama आणि Elon Musk याचं हि अकाऊंट हॅक झाल आहे. 

हो झालय अस! 

आणि हे सगळे ट्विटर व्हेरीफाईड अकाऊंटस आहेत व सर्व अकाऊंटस एका रात्री मध्ये हॅक झाले आहेत. जगातील एक सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण जेफ बेजोस त्यांचा पण यात समावेश आहे.


  
हॅकर्सनी केल अस त्यांनी एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे या अकाऊंटस वर ट्विट केली. त्यांनी लोकांना अस सांगितल कि आपण जर या ट्विट मधील लिंक वर जाऊन जेवढे बिटकॉईन आम्हाला पाठवतात त्याच्या दुप्पट बिटकॉईन तुम्हाला मिळतील. 

आणि मजेशीर अस कि हे सगळ फक्त 30 मिनिटांत करायचं होत. तरच दुप्पट पैसे मिळतील व लोकांनी हे केल पण! 

आता दुप्पट पैसा कोणाला नको वाटेल, आणि यातून त्या हॅकर्सनी तब्बल 90 लाख फक्त 2 तासांत कमावले.

ट्विटर या बद्दल अस सांगितल कि ते याच इन्वेस्टीगेशन करत आहेत. पण हा हॅक झालाच कसा हा प्रश्न होता? 
त्याच उत्तर अस कि हॅकर्सनी ट्विटरच्या इंटर्नल टूल्सचा वापर केला व या अकाऊंटस चा एक्सेस घेतला.  


सरळ सांगायचं झाल तर ट्विटर पण सुरक्षित नाही आहे. व्हेरीफाईड अकाऊंटस हॅक होत आहेत तर आपलं काय.   

एवढ सगळ होऊन हॅकर्सचा कोणताही पत्ता लागला नाही.

आता बिटटोरंट चे संस्थापक जस्टीन सन यांनी अस सांगितल आहे, कि जो कोणी या हॅकर्सचा शोध लावेल त्याला 1 मिलियन डॉलर दिले जातील.
पण ज्यांचे पैसे गेले ते तर दुखी असणारच आता प्रश्न येतो तो ट्विटरच्या सुरक्षितते बाबत जर एवढे  व्हेरीफाईड अकाऊंटस हॅक होत आहेत तर आपलं काय.                 

Post a Comment

Previous Post Next Post